मौदा: शहराजवळच्या कन्हान नदीच्या पाण्यात 16 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू
Mauda, Nagpur | Jun 4, 2026 मित्रांसोबत पोहायला गेलेल्या 16 वर्षीय मुलाचा कन्हान नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. सत्यम भगवंत गुप्ता वय 16 वर्षे राहणार टीचर कॉलनी मौदा असे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी मौदा पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.