जळगाव: सुप्रिम कॉलनीतील वृध्दाची राहत्या घरात गळाफास घेवून आत्महत्या; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल
जळगाव शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरात राहणाऱ्या ६५ वर्षीय वृध्दाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी ३ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी सकाळी ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.