संगमनेर–नारायणगाव रेल्वेसाठी आंदोलनाचा एल्गार! ९ ऑगस्टला नागरिक रस्त्यावर
पुणे ग्रामीणमधून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या संगमनेर–आळेफाटा–नारायणगाव–मंचर रेल्वे मार्गाच्या मागणीसाठी ९ ऑगस्ट रोजी आंदोलन करण्यात येणार आहे. 🚆🚨
नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांच्या वतीने हे आंदोलन करण्यात येणार असून, या रेल्वे मार्गामुळे परिसरातील अनेक गावांना थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळण्यास मदत होईल, असा दावा करण्यात येत आहे.
रेल्वे मार्ग सुरू झाल्यास शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे. तसेच पुणे आणि नाशिक या दोन महत्त्वाच्या शहरांमधील दळणवळण अधिक सुलभ होण्यास मदत होऊ शकते.
मागणी अद्याप प्रलंबित असल्याने नागरिकांमध्ये नाराजी असून, शासनाने या प्रस्तावाची गांभीर्याने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली आहे.
#Sangamner #Narayangaon #Alepata #Manchar #RailwayProject #RailwayDemand #PuneRural #PuneNews #NashikNews #RailwayNews #MaharashtraNews #Andolan #BreakingNews #LocalNews #TimesOfMaharashtra
Pune City, Pune | Aug 12, 2026