कर्जत: कोट्यवधींचा खर्च, तरी पाली-भुतिवली धरण अपूर्णच
Karjat, Raigad | May 17, 2026 कर्जत तालुक्यातील पाली-भुतिवली धरण प्रकल्पावर गेल्या तीन दशकांत कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला, मात्र आजही हा प्रकल्प पूर्णत्वास गेलेला नाही. शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवून परिसर सुजलाम सुफलाम करण्याचे स्वप्न दाखवण्यात आले; पण प्रत्यक्षात कालवे उद्ध्वस्त झाले, काही ठिकाणी अतिक्रमणे झाली आणि शेतकऱ्यांच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत. त्यामुळे या प्रकल्पाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.