उमरेड: विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय मेश्राम यांची पावसाळी अधिवेशनात तालिका अध्यक्षपदी निवड, कार्यकर्त्यांमध्ये आनंद
Umred, Nagpur | Jun 30, 2025 उमरेड विधान सभेचे आमदार श्री संजय मेश्राम यांचे राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान पहिल्याच दिवशी आज ३० जून सोमवारला दुपारी दीड वाजता तालिका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. आमदार संजय मेश्राम यांच्या तालिका अध्यक्ष या पदावरील निवडीने उमरेड मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे.