पेण: आता रायगड जिल्ह्यात अनेक गावांवर दरडींची टांगती तलवार
Pen, Raigad | Apr 29, 2026 पर्यटनासाठी सेकंड होम साठी आणि येऊ घातलेले विविध प्रकल्प ही रायगड जिल्ह्याची नवीन ओळख होत आहे मात्र हा विकास करीत असताना दुसरीकडे मातीसाठी पोखरण्यात येणारे डोंगर, त्याठिकाणी करण्यात येणारी बांधकामे, यामुळे रायगड जिल्ह्यात दरड कोसळून अपघात होऊ शकणाऱ्या संभाव्य दरडग्रस्त गावांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. मागील दहा वर्षात दरडीपासून धोका असलेल्या गावांची संख्या १०३ वरुन ३९२ पर्यंत वाढली आहे. पाऊस महिन्याभरावर आला आहे.