सेलू: हिंगणित मोहा दारू विक्रेत्यावर पोलिसांची कारवाई, ११ लिटर गावठी दारू जप्त
Seloo, Wardha | Nov 7, 2024 गावठी दारूची विक्री करतांना आरोपी अनिल उर्फ नामा कवडू उईके वय 30 रा. हिंगणी याला पोलिसांनी रंगेहात अटक केली. त्याचे ताब्यातून 11 लिटर गावठी मोहा दारूसह 2 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई ता.7 गुरुवाराला दुपारी 3.30 वाजता सेलू पोलिसांनी केली. याप्रकरणी आरोपी विरुद्ध सायंकाळी 5.30 वाजता गुन्हा नोंद करण्यात आला. अशी माहिती सेलू पोलिसांनी दिली.