सेलू: सुरगाव शिवारात पिकाचे नुकसान, सेलू पोलिसांत तक्रार दाखल
Seloo, Wardha | Nov 6, 2024 शेतातील पिकातून ट्रॅक्टर नेत कपाशी पिकाचे नुकसान केले. ही घटना तालुक्यातील सुरगाव शेत शिवारात ता. 6 बुधवारी सकाळी 11 वाजता घडली. याप्रकरणी दिनेश कामराज गायकवाड रा. सुरगाव यांनी सोनू गायकवाड रा. सुरगाव याचे विरुद्ध दुपारी 1 वाजता पोलिसांत तक्रार दाखल केली. अशी माहिती सेलू पोलिसांनी दिली.