रत्नागिरी पोलीस दलाकडून गोपाळगड येथे स्वच्छता मोहीम.
मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली रत्नागिरी पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांनी गुहागर तालुक्यातील ऐतिहासिक गोपाळगड किल्ल्यास भेट देऊन स्वच्छता मोहीम राबविली.
स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक वारशाचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने गोपाळगड किल्ल्यातील ऐतिहासिक कोठार परिसराची स्वच्छता करण्यात आली. यावेळी पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी परिसरातील कचरा, झुडपे व इतर अडथळे दूर करून कोठार परिसर स्वच्छ व सुस्थितीत आणला.
ऐतिहासिक वारसा स्थळांचे जतन, संवर्धन तसेच स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात आली. रत्नागिरी पोलीस दलाकडून सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून अशा विविध उपक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यात येत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांनी कोणत्याही अफवा अथवा दिशाभूल करणाऱ्या संदेशांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही तक्रार, माहिती अथवा मदतीची आवश्यकता असल्यास तात्काळ डायल ११२, रत्नासेतू चॅटबॉट क्रमांक ९३७१४१५६१२ किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन रत्नागिरी पोलीस दलामार्फत करण्यात आले आहे.
CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #gopalgad #ratnagiri #RatnagiriPolice
11 views | Ratnagiri, Maharashtra | Jun 2, 2026