कर्जत: जि.प. शाळांत स्वच्छ पाण्याचा मुद्दा ऐरणीवर
Karjat, Raigad | Jun 7, 2026 जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक शाळेत पिण्याच्या पाण्याच्या टाक्या उभारण्यात आले आहेत. ही बाब जरी चांगली असली तरी या टाक्या वेळोवेळी स्वच्छता करणे गरजेचे असते, मात्र असे असूनही कर्जत तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमधील पिण्याच्या पाण्याच्या टाक्या ह्या स्वच्छ केलेल्या नसल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे या टाक्यांमधील दूषित पाणी पिऊन विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.