जाफराबाद: काँग्रेस तालुकाध्यक्ष अजय बनकर यांनी वीरखेडा,मेरखेडा येथे साधला गावकरी व नागरिकांशी संवाद
आज दिनांक 5 जुलै 2026 वार रविवार रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास काँग्रेस आपल्या दारी – जनसंपर्क दौरा" अंतर्गत जाफराबाद काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अजय बनकर यांनी तालुक्यातील विरखेडा भालके, मेरखेडा, कुंभारी, खासगाव, शिंदी, खापरखेडा, गोपी आणि सवरगाणी या गावांना भेट देऊन जनतेशी थेट संवाद साधला आहे, यावेळी त्यांनी जनतेच्या नागरिकांच्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत घराघरात काँग्रेसच्या विचारधारा पोहोचवण्याचा निर्धार घेतला आहे.