निफाडमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिमय सांगता! जातीभेद विसरून ग्रामस्थ एकवटले
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील श्री क्षेत्र दिंडोरी तास येथील हनुमान मंदिरात ३ ते १० ऑगस्टदरम्यान आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिमय वातावरणात सांगता झाली. 🙏🚩
या सप्ताहात गावातील विविध समाजातील नागरिकांनी जातीभेद बाजूला ठेवून एकजुटीने सहभाग घेतला. विशेष म्हणजे नवतरुण पिढीनेही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सामाजिक एकतेचा संदेश दिला.
सप्ताहादरम्यान दररोज श्रीराम कथेचे आयोजन, महिला-पुरुषांचा हरिपाठ, मृदंग व फुगडी नृत्य तसेच सायंकाळी अन्नदान करण्यात आले. दररोज हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
९ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र भूषण पुरस्कारप्राप्त समाज प्रबोधनकार ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांचे कीर्तन झाले. तर १० ऑगस्ट रोजी ह.भ.प. सुधाकर महाराज पैठणकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली.
#Niphad #Nashik #HarinaamSaptah #Bhakti #HanumanMandir #Kirtan #MaharashtraNews #NashikNews #SocialUnity #Haripath #Mahaprasad #Dindi #BhaktiNews #LocalNews #TimesOfMaharashtra
Pune City, Pune | Aug 12, 2026