श्रीवर्धन: कोळंबी सोडे रस्सा आता फक्त श्रीमंतांसाठी; वाढत्या मागणीमुळे दर गगनाला
कोकणातील पारंपरिक आणि खवय्यांच्या विशेष पसंतीचा पदार्थ असलेल्या सुके कोळंबी सोडे रस्स्याचे दर सध्या गगनाला भिडले असून, किलोमागे 1800 ते 2000 रुपये असा भाव मिळत आहे. त्यामुळे 'सुके कोळंबी सोडे रस्सा आता फक्त श्रीमंतांसाठीच राहिला आहे,' अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांतून व्यक्त होत आहे. रेवदंडा परिसरातील मच्छी मार्केटमध्ये सुके कोळंबी सोडे खरेदीसाठी स्थानिकांसह मुंबई, पुणे, ठाणे येथील चाकरमानी, पर्यटक व पै-पाहुण्यांची मोठी गर्दी होत आहे.