पुणे महापालिकेतच प्लास्टिक बंदीचे नियम धाब्यावर! अधिकाऱ्यांच्या ‘दिवाळी गिफ्ट’वरूनही वाद
पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीतच पातळ प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होत असल्याचा आरोप समोर आला आहे. शहरातील दुकानदार आणि व्यापाऱ्यांवर प्लास्टिक बंदीच्या नियमांनुसार कारवाई करणाऱ्या महापालिकेच्या स्वतःच्या इमारतीत हा प्रकार सुरू असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
दुसरीकडे, महापालिकेच्या अनेक अधिकाऱ्यांना दिवाळीनिमित्त ‘गिफ्ट बॉक्स’ वाटप केले जात असल्याचा प्रकारही समोर आला आहे. सामाजिक कार्यकर्ते भारत सुराणा यांनी यावर तीव्र आक्षेप नोंदवला असून, संबंधित व्हिडिओही समोर आला आहे. पुणे महापालिकेत नेमकं चाललंय तरी काय? या प्रकरणांवर प्रशासन काय भूमिका घेणार?
#PuneNews #PMC #PuneMunicipalCorporation #BharatSurana #PlasticBan #DiwaliGift #PuneUpdates #पुणेमहापालिका #पुणेबातम्या