पेण: पेणमधील चार लाख गणेशमूर्तीच्या निर्यातीचा 'समुद्र प्रवास' सुरू
Pen, Raigad | May 28, 2026 रायगड जिल्ह्यातील पेणमधील गणेशमूर्तीचा परदेशातील समुद्री प्रवास सुरू झाला आहे. दरवर्षी मार्च आणि एप्रिल महिन्यात सुरू होणारी ही निर्यात यंदा आखाती देशांमधील युद्धस्थितीमुळे काही काळ रेंगाळली होती. मात्र, आता मुंबईच्या जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी (जेएमपीए) बंदरातील वाहतूक कोंडी सुटल्याने गेल्या महिनाभरापासून बाप्पाच्या मूर्ती विविध देशांकडे मार्गस्थ होत आहेत. मे महिन्याच्या अखेरपर्यंत सुमारे चार ते साडेचार लाख गणेशमूर्ती परदेशात पोहोचतील, असा विश्वास पेणमधील गणेशमूर्तिकारांनी व्यक्त केला आहे.