पेण: रायगडमध्ये महावितरणच्या स्मार्ट मीटर मोहिमेला यश
Pen, Raigad | Jun 3, 2026 राज्यभर महावितरणतर्फे स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम वेगाने सुरू असून कोकण प्रादेशिक विभागाने यामध्ये आघाडी घेतली आहे. कोकण विभागात आतापर्यंत ४३ लाख ३ हजारांहून अधिक स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. त्यापैकी भांडुप परिमंडलाने १० लाखांपेक्षा अधिक स्मार्ट मीटर बसवून राज्यात दुसरे स्थान मिळविले आहे. रायगड जिल्ह्यातील महावितरणच्या पेण मंडळ कार्यालयांतर्गत चार विभाग, १७ उपविभाग आणि १०५ शाखा कार्यालये कार्यरत आहेत.