तिरोडा: भूमिगत गटार योजनेबाबत नगरपरिषद कार्यालयात आमदार विजय रहांगडाले यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न
Tirora, Gondia | Jul 6, 2025 भुआरी गटर योजनेच्या अंमलबजावणीबाबत नागरिकांच्या तक्रारी व प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर आ.विजय रहांगडाले यांच्या उपस्थितीत एक महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.या बैठकीत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री.मालकर तसेच कामाचे कंत्राटदार उपस्थित होते.बैठकीत नागरिकांनी गटर योजनेमुळे निर्माण झालेल्या समस्यांबाबत आपली नाराजी व्यक्त केली.यावर आमदार श्री.रहांगडाले यांनी स्पष्ट शब्दात कंत्राटदार व प्रशासनाला सुचना दिल्या की काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण झाले पाहिजे.