पोलादपूर: किल्ले रायगडावरून परतताना शिवभक्तांचा अपघात; दोघे गंभीर
रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त लाखो शिवभक्तांनी उपस्थिती लावली होती. मात्र, सोहळ्यानंतर परतीचा प्रवास करत असताना एक अपघात घडला. मुंबई-गोवा महामार्गावरील पार्ले गावाच्या हद्दीत दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दोन शिवभक्त गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये कपिल दशरथ केंदळे (वय 28) आणि अविनाश रामराव सावंत (वय 44) यांचा समावेश असून, ते सातारा जिल्ह्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.