धुळे: शहरातील शिल्पकार सरमद पाटील यांनी बनवला नांदगावातील ३१ फूट उंच शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा,मुख्यमंत्री करणार अनावरण
Dhule, Dhule | Aug 28, 2024 नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथे येत्या 30 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण होणार आहे, हा पुतळा बनवणारे हात हे धुळ्यातील असून शिल्पकार सरमद पाटील यांनी हा पुतळा बनवला आहे. शिवाजी महाराजांचा 31 फूट उंचीचा अश्वारूढ पुतळा बनवण्यासाठी सहमत पाटील यांना तब्बल एक वर्षाहून अधिक कालावधी लागला. यामध्ये त्यांना 12 ते 13 टन हून अधिक ब्राँझ धातू लागला असून यामध्ये इतर देखील धातूंचा वापर या पुतळा बनवण्यामध्ये त्यांनी केला आहे.