पेण: पीएम सूर्यघर योजनेत पेण वीज मंडळाचा डंका
Pen, Raigad | May 20, 2026 महिना 300 युनिटपर्यंत वीजवापर असलेल्या घरगुती ग्राहकांचे वीजबिल शून्य करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महावितरणच्या रायगड जिल्ह्यातील पेण वीज मंडळाने बाजी मारली आहे. महावितरणच्या भांडुप आणि कल्याण या दोन्ही परिमंडलांमध्ये मिळून झालेल्या एकूण कामात एकट्या पेण मंडळाने सर्वाधिक कामगिरी करत अव्वल स्थान पटकावले आहे. मे 2026 पर्यंत पेण मंडळातील तब्बल 6 हजार 151 ग्राहकांच्या घरांवर सौरऊर्जा प्रकल्प यशस्वीपणे बसविण्यात आले आहेत.