पोलादपूर: पोलादपूरमध्ये डम्पिंग ग्राऊंड विरोधात नागरिकांचा एल्गार
पोलादपूरच्या चोळई सावित्री नदी संगमावरील डम्पिंग ग्राऊंडविरोधात नागरिकांनी एल्गार पुकारला आहे. आमची माती आमची माणसं संघटनेने बुधवारपासून अभिनव आंदोलन सुरू केले आहे. याचाच एक भाग म्हणून संघटनेचे अध्यक्ष राज पार्टे यांच्यासोबत डम्पिंग ग्राऊंड येथेच आंदोलन करण्यात आले. यावेळी विरोधी गटनेते व नगरसेवकांचा सहभाग दिसून आला.