खालापूर: रन फॉर युनिटी उपक्रमात खोपोलीकर उत्स्फूर्त सहभागी
राष्ट्रीय एकता दिनानिमित्त खोपोली पोलीस ठाण्याच्या पुढाकाराने आयोजन
राष्ट्रीय एकता दिनानिमित्त ३१ ऑक्टोबर रोजी “रन फॉर युनिटी–अर्थात एकता दौड” या उपक्रमाचे आयोजन खोपोली पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले. या उपक्रमाचा आरंभ खोपोली पोलीस ठाणे येथून झाला. शहरातील विविध भागांतून एकता दौडेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी ठिकठिकाणी दौडचे स्वागत करून सर्वांचा उत्साह अधिकच वृद्धिंगत केला. अखेरीस या दौडची पोलीस ठाण्याच्या आवारात सांगता झाली. खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल यांनी दौड मध्ये सहभागींचे झालेल्यांचे आभार मानले.