भिवापूर: गाव तलावात मासे मरण पावल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका ; भाजपच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन
भिवापूर शहराच्या हद्दीत येत असलेल्या गाव तलावातील पाणी सोडल्यामुळे या तलावात असलेले मासे पाण्याअभावी मरण पावले. त्यामुळे शहरात चार पाच दिवसा पासून शहरात दुगंधी युक्त वास येत असल्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत भिवापूर भाजपा शहर वतीने उपविभागीय अधिकारी आणि नगरपंचायत प्रशासनाला आज १९ जून गुरुवारला दुपारी तीन वाजता निवेदन देण्यात आले.