पोलादपूर: रायगडातील धरणांनी गाठला तळ
शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा संपली मात्र बळीराजा आभाळाकडे आजही डोळे लावून बसलाय. धरणावर अवलंबून असलेल्या गावे आणि वाड्यांना भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. पाणी पिण्यासाठी पायपिट करावी लगत आहे. जिल्ह्यातील धरणांच्या पाण्याची पातळी कमी झाली असून, अनेक धरणांनी तळ गाठला आहे. त्यामुळे पाण्याची समस्या भीषण होऊ लागली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ९२ गावे व ३०३ वाड्यांवरील १ लाख ५३ हजार १५७ नागरिकांना पाणीटंचाईने ग्रासले असून, त्यांना ७८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.