सावनेर: व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटने कडून सावनेरच्या पहिल्या महिला पोलीस अधीक्षक ऋतुजा जाधव यांचे स्वागत
Savner, Nagpur | May 22, 2026 सावनेर पोलीस स्टेशनच्या इतिहासात प्रथमच महिला पोलीस निरीक्षक म्हणून ऋतुजा दीपक जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुणे शहर पोलीस पदातून दिनांक 13 मे 2026 रोजी त्यांची बदली झाल्यानंतर त्यांनी 14 मे रोजी सावनेर पोलीस स्टेशन चा तात्काळ पदभार स्वीकारून आपल्या सेवेला सुरुवात केली यावेळी पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्याकडून त्यांनी पतभार स्वीकारला त्यांच्या नियुक्तीमुळे सावनेर परिसरात महिला नेतृत्वाला नवे बळ मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे