हिंगणघाट: संत चोखोबा वार्डातील ४० वर्षीय इसमाची राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या
हिंगणघाट शहरातील संत चोखोबा वार्डातील ४० वर्षीय इसमाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली असून मृत्यकाचे नाव संतोष पुसनाके असे असल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.प्राप्त माहितीनुसार मृत्यक संतोष यांच्या पत्नी श्रध्दा पुसनाके हिने दिलेल्या तक्रारीनुसार मृत्यकाला ४ हिन्या अगोदर टिबीची बिहारी झाली होती.त्यामुळे तो चिंतेत राहत होता.पत्नी सामायण आणण्यासाठी दुकानात गेली असता याच दरम्यान संतोष याने स्वयंपाक खोलीतील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.