हिंगणघाट: सकारात्मकतेच्या मार्गावरही स्मरण होणे हीच खरी समाजसेवा; आमदार कुणावारांचे तुळसकर सभागृहात धन्यवाद कार्यक्रमात प्रतिपादन
हिंगणघाट पुणे येथे नुकतेच पार पडलेल्या तेजज्ञान फाउंडेशनच्या महाआस्मान शिबिरात आमदार समिर कुणावार हे सह कुटुंब सहभागी झाले होते.तसेच शहरातील अनेक नागरीकांनी या शिबीराचा लाभ घेऊन यातून आत्मिक उन्नती, अंतर्मनाची शुद्धता आणि सकारात्मक विचारांचा अत्यंत प्रभावी अनुभव घेतला.शहरातील तुळसकर सभागृहात धन्यवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी आमदार समिर कुणावार यांनी शिबिरात आपले अनुभव व्यक्त करीत धर्म, अध्यात्म आणि सकारात्मकतेच्या मार्गावरही समरस होणे हीच खरी समाजसेवा आहे.