श्रीवर्धन: महेंद्र घरत यांची जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी
रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदावरून महेंद्र घरत यांची तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे. घरत यांच्या हकालपट्टीमुळे रायगड काँग्रेसमध्ये बंड सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. सुमारे 50 हून अधिक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याची माहिती समोर येत आहे. रायगड जिल्ह्याची उत्तर आणि दक्षिण अशी दोन भागात विभागणी केल्यानंतर रायगड काँग्रेसमध्ये नाराजीचा मोठा भडका उडाला आहे. महेंद्र घरत यांना भाजप नेते रामशेठ ठाकूर यांच्याशी असलेली जवळीक भोवल्याची चर्चा आहे.