समग्र प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षण तळेगाव दशासर तालुका धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती
26 views | Amravati, Maharashtra | Oct 6, 2026 *प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव दशासर येथे दोन दिवसीय CPHC प्रशिक्षण शिबिराला जिल्हास्तरीय टीम यांची भेट व उत्साहात संपन्न* *धामणगाव रेल्वे तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव दशासर येथे समग्र प्राथमिक आरोग्य सेवा अर्थात CPHC अंतर्गत दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाले.* *या प्रशिक्षणामध्ये समग्र प्राथमिक आरोग्य सेवांच्या १३ प्रमुख सेवांबाबत प्रशिक्षणार्थींना सैद्धांतिक तसेच प्रात्यक्षिक स्वरूपात मार्गदर्शन करण्यात आले. नागरिकांना दर्जेदार, सर्वसमावेशक व प्रभावी प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्ये आणि व्यावहारिक बाबींवर प्रशिक्षण देण्यात आले.* *प्रशिक्षण शिबिरास CPHC प्रशिक्षणाचे जिल्ह्याचे नोडल अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी माननीय डॉ. हर्षल क्षीरसागर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन प्रशिक्षणाची पाहणी केली. यावेळी त्यांनी सर्व प्रशिक्षणार्थींशी संवाद साधून त्यांचे मनोगत जाणून घेतले. यावेळी जिल्हा आयुष्य अधिकारी डॉ. पल्लवी आगरकर तसेच जिल्हा प्रसिद्धी प्रमुख श्रीमती वनिता शिंदे अमरावती उपस्थित होत्या.* *या प्रशिक्षणासाठी डॉ. शुभांगी दिघाडे, डॉ. मंगेश पाटील, श्री अभिषेक जिरापूरे, श्री प्रवीण रमेशपंत निंभोरकर, श्री प्रवीण ढोले, श्री राजूभाऊ मेश्राम, श्री गोरखनाथ तायडे व श्रीमती अरुणा कांबळे यांनी प्रशिक्षक म्हणून मोलाची भूमिका बजावली.* *सलग दोन दिवस चाललेल्या या प्रशिक्षणात CPHC अंतर्गत १३ प्रकारच्या सेवांचे सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणार्थींच्या शंकांचे निरसन तसेच प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात येणाऱ्या अडचणींवर प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले.* *प्रशिक्षणामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना CPHC अंतर्ग