जाफराबाद: पासोडी येथे गावाच्या वेशीवर मातंग समाजाच्या तरुणाला टवाळ खोरांकडून अमानुष मारहाण, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
आज दिनांक एक मे 2026 वार शुक्रवार रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार जाफराबाद तालुक्यातील पासोडी येथे गणेश केशव निकाळजे या तरुणाला30 एप्रिल रोजी काही अज्ञात टवाळखोरांनी अमानुष मारहाण केली आहे, ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून जाफराबाद पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे, मात्र अद्याप पर्यंत कुठलाही कारवाई पोलिसांनी केलेली नाही त्या मुळे कारवाईची मागणी होत आहे.