कल्याणच्या कुमुध वाडेकर यांची SAI (Sports Authority of India)च्या प्रतिष्ठित NSNIS डिप्लोमा कोर्ससाठी निवड,महाराष्ट्रातून दोघांची निवड ,जागृती फाउंडेशनतर्फे कुमुध रवींद्र वाडेकर यांचा सत्कार करत दिल्या शुभेच्छा
कल्याण : कल्याण येथील तिरंदाज कुमुध रवींद्र वाडेकर यांची Sports Authority of India (SAI) अंतर्गत नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा संस्था (NSNIS), पतियाळा येथे आयोजित करण्यात येणाऱ्या अत्यंत प्रतिष्ठेच्या डिप्लोमा इन स्पोर्ट्स कोचिंग (शैक्षणिक वर्ष २०२६–२७) अभ्यासक्रमासाठी अधिकृत निवड झाली आहे.
या निवडीमुळे कुमुध वाडेकर यांनी आपल्या क्रीडा कारकिर्दीत आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. विशेष म्हणजे आशियातील सर्वात मोठ्या आणि नामांकित क्रीडा प्रशिक्षण संस्थांपैकी एक असलेल्या NSNIS, पतियाळा येथे प्रवेश मिळवणे ही मोठी कामगिरी मानली जाते.
कुमुध वाडेकर यांची निवड तिरंदाजी (Archery) या क्रीडा प्रकारासाठी ६४व्या बॅचमध्ये (64th Batch)
Kalyan, Thane | Jul 11, 2026