हिंगणा: वेणा नदीच्या पूरसंरक्षण भिंतीमुळे कोतेवाडा गाव सुरक्षित; आमदार समीर मेघे यांच्या पुढाकाराला यश
Hingna, Nagpur | Jul 31, 2026 31 जुलैला सकाळी 11 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार आमदार समीर मेघे यांच्या विशेष पुढाकाराने आणि आपत्ती सौम्यीकरण योजनेअंतर्गत कोतेवाडा येथे वेणा नदीवर ५.५० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या पूरसंरक्षण भिंतीमुळे कोतेवाडा गावाला मोठा दिलासा मिळाला आहे. या भक्कम संरक्षक भिंतीमुळे आता येथील ग्रामस्थांचा पुराचा धोका टळला असून गाव पूर्णपणे सुरक्षित झाले आहे. या विकासकामामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, आमदार समीर मेघे यांच्या पाठपुराव्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांच