चैनस्नॅचिंग करणाऱ्या सराईत आरोपीला अटक – गुन्हे प्रकटीकरण कक्ष-४ मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीसांची दमदार कामगिरी!
670 views | Thane, Maharashtra | Mar 31, 2026 10 मार्च 2026 रोजी सकाळी सुमारे 7 वाजता अहमदाबाद–मुंबई महामार्गावर फिर्यादी पायी चालत असताना मोटारसायकलस्वाराने त्यांच्या गळ्यातील सुमारे 2 तोळे (₹1.05 लाख) किमतीचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. या प्रकरणी काशिगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. तपासादरम्यान CCTV विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे आरोपी मोहम्मद अन्सारी (वय 23, गोवंडी) यास 28 मार्च रोजी मध्यप्रदेशातील कुक्षी येथून अटक करण्यात आली. आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर चोरी, दरोडा आदी एकूण 20 गुन्हे दाखल आहेत. सध्या आरोपीला पुढील तपासासाठी काशिगाव पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून तपास सुरू