हिंगणा: महाजन वाडी परिसरात अज्ञात आरोपीयांनी घरफोडी करून 1लाख 42 हजार रुपयांचा मुद्देमाल नेला सोडून
Hingna, Nagpur | Apr 5, 2026 पोलीस ठाणे एमआयडीसी. हद्दीत,महाजनवाडी, येथे राहणारे फिर्यादी अकरम मोहम्मद खान, वय ४७ वर्षे हे आपले राहते घराला कुलुप लावुन परिवारासह नातेवाईकाकडे साक्षगंधाचे कार्यक्रमाकरीता शिरपूर, जि. वर्धा येथे गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे घराचे मुख्य दाराचे कुलूप व कडी-कोंडा तोडुन, आंत प्रवेश करून, बेडरूममधील लोखंडी आलमारीतील रोख ७२,०००/- रू. तसेच, सोन्याचे वेगवेगळे दागिने असा एकुण किंमती १,४२,०००/- रू. चा मुद्देमाल चोरून नेला.