पोलादपूर: पोलादपूरमध्ये अवैध गुरांची वाहतूक उघड
पोलादपूर तालुक्यातील कापडे गावाच्या हद्दीत अवैधरित्या गुरांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर गोरक्षकांनी तत्पर कारवाई करत एक पिकअप वाहन अडवले. या कारवाईत चार गुरांसह संबंधित वाहन पोलादपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. रोहा तालुक्यातून चार गुरे घेऊन जाणारी एम एच १३ सीइ १९७६ क्रमांकाची पिकअप गाडी कापडे गावाच्या हद्दीतून जात होती. गुरांची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत वाहनाची तपासणी केली.