अलिबाग: सौ गुलाब सुधीर गायकवाड यांचा आदर्श माता पुरस्काराने सन्मान
Alibag, Raigad | Sep 7, 2026 सौ. गुलाब सुधीर गायकवाड यांचा ‘आदर्श माता’ पुरस्काराने सन्मान श्री समर्थ विचार फाऊंडेशनतर्फे आयोजन; मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव अलिबाग | प्रतिनिधी : मुलांच्या जडणघडणीत आणि त्यांच्या यशस्वी वाटचालीत आईची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. त्याग, संस्कार आणि कुटुंबासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत सौ. गुलाब सुधीर गायकवाड यांचा ‘आदर्श माता’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. श्री समर्थ विचार फाऊंडेशनतर्फे या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी किशन जावळे, आदर्श नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पाटील, जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद अमित नाईक, अलिबागच्या उपनगराध्यक्ष ॲड. मानसी म्हात्रे, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. प्रवीण ठाकूर, रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, नगरसेवक ॲड. अंकित बंगेरा, डॉ. संदेश पाटील तसेच कार्यक्रमाचे आयोजक रत्नाकर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सौ. गुलाब सुधीर गायकवाड या किहीम ग्रामपंचायतीचे सरपंच प्रसाद तथा पिंट्या गायकवाड यांच्या मातोश्री आहेत. कुटुंबाला संस्कारांची शिदोरी देत मुलांच्या प्रगतीमध्ये मोलाची भूमिका बजावणाऱ्या गुलाब गायकवाड यांच्या कार्याची दखल घेत त्यांना ‘आदर्श माता’ पुरस्काराने गौरविण्यात आले. या सन्मानामुळे गायकवाड कुटुंबीयांसह किहीम परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, गुलाब गायकवाड यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मातृत्वातील त्याग, संस्कार आणि कुटुंबासाठीचे योगदान यांचा गौरव करणारा हा सन्मान प्रेरणादायी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.