नाशिक पुणे हायवेवर वाढत्या अपघातामुळे नागरिक त्रस्त झाले असून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. नाशिक पुणे हायवेवरून लहान मोठे तसेच अवजड वाहतूक सुरू असते. त्यामुळे द्वारका ते नाशिक रोड सिन्नर फाटा या दरम्यान वाहतूक कोंडी निर्माण होत असते वाहतूक सुरळीत होण्यासाठी प्रशासनाने कुठलीही उपाययोजना न केल्याने लहान-मोठे अपघात रोजच घडत आहे.कित्येक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.