अंबरनाथ: बदलापूर परिसरातील एका हात गाडीवर सिलेंडरचा स्फोट एक जण जखमी, आजूबाजूच्या घरांच्या काचांना तडे
बदलापूर येथील म्हात्रे चौकामध्ये सकाळच्या सुमारास एका हात गाडीवरील सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली होती. या सिलेंडरच्या स्फोटामध्ये एक जण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तात्काळ अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. स्फ़ोटाची तीव्रता इतकी होती की आजूबाजूच्या इमारतीतील घरांच्या काचा देखील तुटल्या आहेत. सकाळची वेळ होती आणि आजूबाजूला कोणीही नव्हते त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.