ठाणे - जंताचा प्रादुर्भाव थांबवूया, मुलांना सशक्त बनवूया !
राष्ट्रीय जंतनाशक दिन - ४ डिसेंबर २०२४
1.2k views | Thane, Maharashtra | Dec 3, 2024 ठाणे - जंताचा प्रादुर्भाव थांबवूया, मुलांना सशक्त बनवूया! जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय जंतनाशक दिन ४ डिसेंबर २०२४ रोजी साजरा होणार असून १ ते १९ वयोगटातील मुला मुलींना जंतनाशक गोळी जवळच्या शाळा अंगणवाडी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये खायला दिली जाणार आहे. जी मुले ४ डिसेंबर ला मोहिमेच्या दिवशी अनुपस्थितीत राहतील त्यांना १० डिसेंबर २०२४ रोजी मोप अप दिनी जंतनाशक गोळ्या खाऊ दिल्या जाणार आहेत.