श्रीवर्धन: दिवेआगर नगरीत यात्रेची लगबग सुरु
श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर नगरीत यात्रेची सुरुवात दिसून येत आहे. दिवेआगर हे सुवर्ण गणेश मंदिर तसेच विस्तीर्ण समुद्रअसा किनारा म्हणून ओळखला जाणार पर्यटन स्थळ आहे. दिवेआगर येथे चैत्र शु. चतुर्दशी व पौर्णिमेला श्री. सिद्धनाथ आणि श्री. केदारनाथ यात्रा भरवली जाते. यात्रेला पंचक्रोशीतून तसेच राज्यभरातुन भाविक दर्शनासाठी येत असतात. यात्रेचे मुख्य वैशिष्ट म्हणजे गळी फिरणे व हातकोडे हे बघायला भाविक मोठया प्रमाणात गर्दी करत असतात. यात्रेच्या आधी दोन दिवस गावातून श्रीभैरवनाथाची परडी फिरवली जाते. दरवर्षी प्रमाणे गावातील मंडळीकडून मान दिला जातो.