पोलादपूर: कशेडी घाटामध्ये डंपरच्या पाठीमागे कार घुसली; आई गंभीर जखमी
मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात सोमवारी दुपारी भरधाव कार डंपरच्या मागील भागात घुसून झालेल्या भीषण अपघातात मुलाचा मृत्यू झाला असून आई गंभीर जखमी झाली आहे. महिलेला एमजीएम हॉस्पिटल कळंबोली येथे अधिक उपचारासाठी पाठवले आहे. कल्याण राहणारे लिसी बालन व मुलगा निकेश बालन हे मुंबई-गोवा महामार्गावर भुयारी महामार्गावरून मुंबईकडे निघाले होते. भरधाव कार अनियंत्रित झाल्याने ती पुढे जाणाऱ्या डंपरच्या मागील भागात घुसली.