पोलादपूर: 28 हजार नागरिकांची पाण्यासाठी वणवण
दिवसेंदिवस रायगड जिल्ह्यातील पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. जिल्ह्यातील 15 तालुक्यांपैकी 4 तालुक्यात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या चार तालुक्यातील 72 गावे व वाड्यांमधील सुमारे 28 हजार नागरिकांना 15 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू आहे. पाणीपुरवठा पुरेसा नसल्याने या गावातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याचे चित्र दिसून येत असून, दोन-ते तीन किलोमीटरची पायपीट करुन त्यांना पाणी आणावे लागत आहे. मागील तीन आठवड्यात जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावे-वाड्यांमध्ये 55 ने वाढ झाली आहे.