शहादा: टुकी गावाजवळ २ बैलांची झुंज सुरू असताना एक बैल थेट कारमध्ये घुसला, सुदैवाने कार मधील २ जण बचावले
शहादा तालुक्यातील टुकी गावाजवळ दोन बैलांमध्ये झुंज सुरू असताना एक बैल समोरून येणाऱ्या कार मध्ये धडकल्याने कार मध्ये अडकला सुदैवाने या घटनेमध्ये कारमधील दामळदा येथील ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच व त्यांची पत्नी हे शहादा कडे जात होते सुदैवाने समय सुचकता दाखवत त्यांनी वाहनातून बाहेर निघाले या दरम्यान अडकलेल्या बैलाला उपस्थित नागरिकांनी कारमधून बाहेर काढले.