अंबरनाथ: जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ बदलापूरामध्ये महाविकास आघाडीचे निषेध आंदोलन
जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ बदलापूर मध्ये महाविकास आघाडीने आज दिनांक २४ एप्रिल रोजी दुपारी १२ च्या सुमारास निषेध आंदोलन केलं. यावेळी केंद्रा सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला आहे.