समुद्रपूर: कोरा चिमुर रसत्यावर लालमातीच्या चिखलाचे साम्राज्य: चिखलात अनेक बस सह वाहन अडकल्या:प्रवाशांचे बेहाल
हिंगणघाट चिमुर राज्य मार्गांचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे.मात्र या रस्त्यावर मुरमा ऐवजी लाल मातीचा वापर केल्याने गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून आज शुक्रवारी १२ एप्रिलला सकाळी १० वाजता कोरा गावाजवळ अमरावती चिमुर बससह अनेक वाहने अडकली यामुळे या बस मध्ये सेवाग्राम रुग्णालयात जाणारे रुग्ण ,समुद्रपूरला बी.एसी परीक्षेचे पेपर देण्या करिता जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल बेहाल झाले होते.