समुद्रपूर: हिवरा शेत शिवारात विज पडून बैलजोडी ठार: शेतकऱ्याचे १ लाख रुपयांचे नुकसान
हिवरा शेत शिवारात ११ एप्रिलला रात्री २ वाजताच्या सुमारास विजेच्या कळकळासह आलेल्या पावसामध्ये शेतात बांधून असलेल्या बैलजोडीवर विज पडून बैलजोडी जागीच ठार झाल्याची घटना आज शुक्रवारी १२ एप्रिलला सकाळी उघडकीस आली आहे.प्राप्त माहितीनुसार शुक्रवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास हिवरा येथिल शेतकरी यशवंत बहादुरे यांच्या मालकीची बैलजोडी चारपाणी करुन शेतात बांधून ठेवली होती.रात्री २ वाजताच्या सुमारास विजेच्या कळकळासह आलेल्या पावसामध्ये शेतात बांधून असलेली १ लाख रुपये किंमतीची बैलजोडी ठार झाली