अकोला: नियोजन भवन येथे ‘आपला पैसा आपला अधिकार’ मोहिमेला सुरूवात; ४२ कोटींच्या ठेवींचे निकालीकरण
Akola, Akola | Nov 1, 2025 अकोला : दावा न केलेल्या ठेवींच्या निकालीकरणासाठी ‘आपला पैसा आपला अधिकार’ मोहिमेचा शुभारंभ नियोजन भवन येथे झाला. अकोला जिल्ह्यातील १ लाख ४३ हजार ७४४ निष्क्रिय खात्यांमध्ये एकूण ४२ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. शिबिरात ठेवीदारांना त्यांच्या रकमेबाबत माहिती देऊन तक्रारींचे निवारण करण्यात आले. कार्यक्रमास सेंट्रल बँकचे पंकज कुमार, आरबीआयचे पीयूष अग्रवाल व जिल्हा प्रबंधक नयन सिन्हा उपस्थित होते. यावेळी “तुमचे पैसे तुमचा हक्क” पुस्तकाचे प्रकाशनही झाले.अशी माहिती दिनांक 1 नोव्हेंबर रोजी सायंकाळी