Big Breaking News : पुण्यात दिवाळीत फटाक्यांचा कहर! लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ७ तासांत ४८ ठिकाणी आगीच्या घटना
दिवाळीच्या उत्साहात पुणेकरांसाठी धक्कादायक बातमी! लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे पुणे शहरात तब्बल ४८ ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या. सुदैवाने या सर्व घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही.
पुणे अग्निशमन दलाला दुपारी ३ ते रात्री १० या सात तासांत आगीच्या ४८ वर्द्या मिळाल्या. कोथरूड, खराडी, कोंढवा, धायरी, सिंहगड रोड आणि मध्यवस्तीतील पेठ भागांत आगीच्या घटना घडल्या. घरांच्या गॅलरी, टेरेसवरील ताडपत्री, सुके गवत, कचरा आणि झाडांना फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे आग लागली. काही फ्लॅट आणि दुकानांमध्येही आग पोहोचली.
दरम्यान, सातारा रोडवरील सिटीप्राईडसमोर असलेल्या सोनावणे इंडस्ट्रीजमधील फ्लेक्स प्रिंटिंग दुकानाला रात्री पावणेनऊच्या सुमारास मोठी आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ४ फायर �