पुण्यात कोइटा टोळ्यांचा धुमाकूळ! केशवनगर-मंजरी रस्त्यावर दोन गट आमनेसामने; कुऱ्हाडी घेऊन सोसायटीत घुसल्याची घटना CCTV मध्ये कैद
पुण्यातील केशवनगर-मंजरी रस्त्यावर कोइटा टोळीच्या दोन गटांमध्ये वर्चस्वाच्या वादातून भीषण संघर्ष झाल्याची घटना समोर आली आहे. दोन्ही गटांतील सदस्य हातात कुऱ्हाडी घेऊन एकमेकांसमोर उभे ठाकल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, कुऱ्हाडी घेऊन काही आरोपींनी एका सोसायटीत प्रवेश केला. यावेळी दहशत पसरवण्याचा आणि हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे सोसायटीतील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
विशेष म्हणजे, ही संपूर्ण घटना सोसायटीत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या व्हिडिओमुळे परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
#PuneCrime #KeshavNagar #Manjari #PuneNews #CCTV CrimeNews कोइटाटोळी पुणेक्राईम पुणेबातमी
Pune City, Pune | Nov 25, 2026