१५० वर्षे जुने शिवमंदिर गंगेच्या पुरात वाहून गेले! मालद्यात नदीची भीषण धूप; परिसराला मोठा धोका
पश्चिम बंगाल : मालदा जिल्ह्यातील रातुआ भागातील सुमारे १५० वर्षे जुने शिवमंदिर गंगा नदीच्या वेगाने होणाऱ्या धूपेमुळे वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फरक्का बॅरेजमधून अंदाजे १.२ दशलक्ष क्युसेक पाणी सोडण्यात आल्याने गंगा नदीचा प्रवाह वाढला आहे. या जोरदार प्रवाहामुळे नदीकाठाची मोठ्या प्रमाणात धूप होत असून, त्याचा फटका ऐतिहासिक शिवमंदिराला बसला.
मंदिर वाहून गेल्याने स्थानिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे आसपासच्या परिसरालाही मोठा धोका निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.
🌊 गंगेच्या भीषण प्रवाहाचा मंदिराला फटका!
🛕 १५० वर्षांचा ऐतिहासिक वारसा नदीत वाहून गेला
⚠️ नदीकाठच्या परिसरावर धोक्याचे सावट
#Malda #Ratua #WestBengal #GangaRiver #GangaFlood #ShivMandir #ShivaTemple #FarakkaBarrages #RiverErosion #FloodNews #WestBengalNews #MaharashtraNews #MarathiNews #BreakingNews #LocalNews